PostImage

pramod abhiman raut

Sept. 17, 2023   

PostImage

विघ्नहर्त्यासमोरच खराब रस्त्यांचे विघ्न..!


 

या वर्षीही गणरायाचे खड्डड्यांतूनच आगमन; रस्त्यांची डागडुजी करण्यात प्रशासन हतबल

चिमूर प्रतिनिधी :-


       गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही चिमूर वरोरा राज्य महामार्ग व तालुक्यांतील बाम्हणी, काग या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवणे प्रशासनाला अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे या वर्षीसुद्धा गणरायाचे आगमन खराब रस्त्यांतूनच होणार की काय, अशी परिस्थिती आहे. विघ्नहर्त्यांसमोरच असलेले हे खराब रस्त्यांचे विघ्न दूर करण्यासाठी तालुक्यांतील चिमूर वरोरा या राज्य महामार्गवरून व बामणी, काग येथील ज्या मार्गावरून गणरायाचे थाटामाटात आगमन होते अशा मार्गाची तरी डागडुजी करावी, अशी मागणी चिमूर वरोरा या राज्यमहामार्गावरील व बामणी, काग येथील वाहतूकदार नागरीक जोर धरू लागली आहे.


       चिमूर वरोरा या राज्य महामार्गावरील व तालुक्यातील बामणी, काग प्रमूख मंडळाच्या श्रीचे आगमन भव्य दिव्य मिरवणुकीने केले जाते. यामध्ये प्रामुख्याने बामणी, काग या मार्गावरून मिरवणुकी काढली जाते. मागील अनेक वर्षापासून चिमूर वरोरा व बामणी, काग या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. मात्र आता जास्तच रस्ता खराब झाल्यामुळे गणेशाच्या आगमनापूर्वी चिमूर, वरोरा, व बामणी, काग या प्रमुख रस्त्यांची डागडुजी तात्काळ करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. 


      येत्या मंगळवारी गणेश चतुर्थी असली तरी त्याच्या एक दिवस अगोदरच मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. काही मंडळांचे गणपती त्याच्याही अगोदर आणले जातात. त्यामुळे किमान आता येत्या एका दिवसांमध्ये चिमूर, खडसंगी, वरोरा, बामणी, काग रस्त्यावरील खड्डे भरले पाहिजेत. सध्या पावसानेही उघडीप दिली असल्याने रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र याकडे प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने कानाडोळा न करता तात्काळ खड्डे पडले आहेत तर ते बुझविण्यात यावे. अशी मागणी गावकऱ्यांनी व हो को को ये - जा करणाऱ्या वाहतूकदारानी  केली आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@

प्रत्येकवेळी रस्ते खराब का होतात?
      दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात गणरायाच्या आगमनावेळी खराब रस्त्यांचा विषय चर्चेला येतो. पावसाळ्यापूर्वी तयार केलेले रस्ते चार-सहा महिन्यांतच खराब होतात. एका पावसातच बहुतांश नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याची चाळण होते. खरे तर हा विषय गंभीर आहे. एकीकडे ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी त्या रस्त्याची जबाबदारी तीन ते सहा वर्षांपर्यंत दिली जाते. असे असताना जर प्रत्येकवेळी पावसाळ्यात रस्ते खराब होत असतील तर त्याच्या मागचे कारणही शोधण्याची गरज आहे.